Presentation by Team - Fourth Pillar


  • Ramprasad Nigudkar
  • Manish Apte
  • Advait Halbe
  • Dipesh Korgaonkar
  • Bhagyashri Jyotiba Pacherkar

“रयतेचे राज्य”


Brief about the presentation

लोकशाही केवळ निवडणूकांपूरतीच मर्यादित न राहता ती अधिकाधिक व्यापक व्हायला पाहिजे.जबाबदार नागरिक बनून निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होणे हे लोकांचे कर्तव्य आहे आणि त्यांचा अधिकार सुध्दा.आपल्या कार्यक्षेत्राबद्दल नागरिकांनी जागरूक असावे.लोकाभिमुख यंत्रणेसाठी, विकास अधिक न्याय्य करण्यासाठी लोकांना आपले मत मांडण्याची संधी कायद्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.आपल्या परिसराच्या विकासाबद्द्ल प्रत्येक स्थानिकाच मत विचारात घेण आवश्यक आहे.प्रकल्पांमुळे स्थानिकांची प्रचंड सोय होणार असते.मात्र त्यांची अंमलबजावणी लोकसहभागाशिवाय होऊच शकत नाही परिणामी प्रगतीचा मार्ग खुंटतो व मागासलेला भाग कायम मागासलेलाच राहतो. स्थानिक परिस्थितीचा विचार न करता प्रकल्प राबवले जात असतील तसेच शासनाकडून सरसकट एकाच प्रकारच्या योजना अंमलात आणल्या जात असतील तर स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्थानिकांना मुभा मिळत नाही आणि अशा कारभारामुळे सामान्य नागरिकाचा आज शासनव्यवस्थेवरचा विश्वास कमी होत चालला आहे. यावर तोडगा म्हणून आम्ही काही नवीन उपाययोजना सुचवत आहोत.